Share

“या” योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार रुपये!

Published On: 

नवी दिल्ली – केंद्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना सुरू करत असतात. या योजनांमध्ये पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये दिले जातात. पण ही रक्कम पेन्शनच्या रूपामध्ये सरकार शेतकऱ्यांना दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातात.

पीएम किसान मानधन योजनेसाठी शेतकऱ्यांना अगदी माफक रक्कम दरवर्षी जमा करावी लागेल. १८ ते ४० वर्षांच्या वयोगटातील कुणीही शेतकऱ्यांसाठीच्या या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

५५ रुपयांपासून १०९ रुपये हप्ता भरावा लागेल –

ही रक्कम ५५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत येते. हा पेन्शन फंड भारतीय जीवन विमान निगम पाहत असते. पीएम किसान मानधन योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांचं वय १८ वर्षांपासून २९ वर्षांपर्यंत आहे. त्यांना ५५ रुपयांपासून १०९ रुपये हप्ता जमा करावे लागतील. तर ३० वर्षांपासून ३९ वर्षांपर्यंतच्या शेतकऱ्यांना दरमहा ११० रुपयांपासून १९९ रुपयांदरम्यान हप्ता द्यावा लागेल. त्याशिवाय जे शेतकरी ४० व्या वर्षी या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील त्यांना दरमहा २०० रुपये हप्ता द्यावा लागेल. जेव्हा शेतकऱ्याचं वय ६० वर्षे होईल, तेव्हा सरकारकडून दर वर्षी ३६ हजार रुपये आणि दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!