🕒 1 min read
मुंबई : भारताचा आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतीच डोंबिवलीमधील एस व्ही जोशी हायस्कुलला भेट दिली. यावेळी रहाणे जुन्या आठवणीत रमल्याचे दिसून आले. यामागील कारण म्हणजे मूळचा डोंबिवलीकर असणाऱ्या रहाणेने त्याचे शालेय शिक्षण याच शाळेत पूर्ण केले आहे.
मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या रहाणेला सध्या विश्रांती देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळेच या मोकळ्या वेळात तो कुटुंबासोबत काही क्षणांचा आनंद घेतोय. नुकतीच त्याने आपल्या डोंबिवलीमधील शाळेला भेट दिली. याबद्दलचा एक व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/tv/Ca327VZl6DA/?utm_source=ig_web_copy_link
“बऱ्याच वर्षांपासून मनात होते की इथे यावे. कारण मी इथूनच माझा क्रिकेट प्रवास सुरु केला. तुमच्या आयुष्यातील काही महत्वाच्या ठिकाणांना भेट देणे फारच खास असते. असे केल्याने तुमचे जमीनीशी असणारं नाते कायम राहते. जागा कितीही बदलली असली तरी या जागेचं माझ्या मनातील स्थान आहे असेच आहे.” असं अजिंक्याने व्हिडीओत म्हणले आहे.
रहाणे पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासोबत डोंबिवलीमधील क्रिकेट मैदानावरही जाऊन आला. लहानपणी ज्या मैदानावर सरावर केला त्याच मैदानाबद्दल तो मोठ्या आपुलकीने पत्नीला वेगवेगळ्या गोष्टी सांगत होता. “मला अनेक वर्षांपासून इथे यायचे होते. पण हे आज शक्य झाले. मी इथूनच क्रिकेटची सुरुवात केली. शाळेने मला पाठिंबा दिला. इथे येणं हे फार खास आहे,” असे रहाणे म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
