मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाही राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली. माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, राज ठाकरे यांच्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत संजय राऊत म्हणाले –
‘नक्कल केली चांगील गोष्ट आहे. नक्कल मोठ्या माणसांची करतात. तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी स्थिती आहे. ईडीनं आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलेलो नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. जे सत्य आहे त्यावर शिवसेना बोलणार डुप्लिकेट काही नाही. “आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे”. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबद्दल उद्या पाहावं लागेल. काही लोक आजारी नसताना ही सक्रीय नसतात. मुख्यमंत्र्या इतक कुणीच सक्रिय नाही, म्हणून तर राज्य पुढं चाललंय’, असे राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरेंकडून संजय राऊतांची नक्कल –
डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो. प्रश्न बोलायचा नाही. आपण काय बोलतो, कसं बोलतो आहोत. भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे. ते उद्या काय शिकतील? असा सवाल करत राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर काल टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
