Share

शेन वॉर्न बांधत होता ५० लाख डॉलरचे अलिशान घर; पहा त्याच्या मृत्यूनंतर कोणाला मिळणार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्न याच्या निधनाला आता पाच दिवस झाले आहेत. थायलंड पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगून वॉर्नच्या निधनामध्ये काही घातपात नसल्याचे स्पष्ट केले. मात्र आता शेन वॉर्नच्या निधनानंतर अनेक नव्या गोष्टी समोर येत आहेत.

शेन वॉर्नने दोन वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया शहरात जमीन विकत घेतली होती. या ठिकाणी तो एक मोठे घर बांधत होता. आता प्रश्न हा निर्माण झाला आहे की वॉर्नचे हे घर कोणाला मिळणार. रिपोर्ट्सनुसार वॉर्न जे घर बांधणार होता त्याची किमीत ५० लाख डॉलर इतकी होती. त्याचे हे नवे घर एका बीचच्या जवळ आहे. यासाठी त्याने ३ मिलियन डॉलरला जमीन खरेदी केली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू झाली होती जी गेल्या वर्षी पूर्ण झाली.

वॉर्नच्या या नव्या घरात ३ बेडरूम, स्वीमिंग पूल, बॉलिंग एरिया, वाइन एरिया आणि जेट स्काय गॅरेज अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्याच्या घराच्या प्लानला  स्थानिक प्रशासनाने मान्यता देखील दिली होती. वॉर्नने खरेदी केलेल्या जमिनीवर आधी टेनिस कोर्ट आणि अन्य गोष्टी होत्या ज्या हटवण्यात आल्या आहेत.

शेन वॉर्नने याआधी २००९ मध्ये ७.५ मिलियन डॉलरला मेंसन खरेदी केले होते. ज्याची नंतर १०.८ मिलियन डॉलरला विक्री करण्यात आली. वॉर्नच्या मृत्यूनंतर नव्याने बांधण्यात येणारे घर कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ५२ वर्षीय वॉर्नला ब्रूक, समर आणि जॅकसन अशी तीन मुले आहेत. त्याच्या निधनावेळी मुले ऑस्ट्रेलियात होती. वॉर्नने २०१५ साली पत्नी सिमोन कलाहनशी घटस्फोट घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!