नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने फिरकी गोलंदाज आर अश्विन कडून एक खास मागणी केली आहे. त्याने मांकडिंग बद्दल केली आहे. दरम्यान मेरीलबोन क्रिकेट क्लब ने आयसीसी ला क्रिकेटच्या नियमांत काही बदलाव करण्याचे सुचवले आहे.
सेहवागने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंट वरून एक ट्वीट केले आहे. त्यात तो म्हणाला “अश्विन तुला शुभेच्छा तुझ्यासाठी हा आठवडा खूप जबरदस्त राहिला. पहिले हे की भारताकडून सर्वात जास्त कसोटी विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तू दुसऱ्या स्थानी पोहचला. आणि दुसरे म्हणजे बटलरला त्याप्रमाणे धावबाद करण्याचे पूर्ण स्वतंत्र. असे एकदा जरूर कर.” असे त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हणले आहे. परंतु अश्विनने यावर अजून कोणतेही उत्तर दिले नाही.
आज एमसीसीने आयसीसीला क्रिकेटच्या नियमांत काही बदलाव करण्याचे सुचवले आहे. त्यांनी कलम ४१ मध्येबदल करण्यास सुचवले आहे. कारण मंकडिंगमुळे खूप वाद होत आहेत. अश्विनने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक जॉस बटलरला ज्याप्रकारे बाद केले होते. त्यावर बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे एमसीसीने कलम ४१ मध्ये बदल करण्यास सुचवले आहे.
महत्वाच्या बातम्या :


