लातूर : साठवणूक करुन ठेवलेल्या सोयाबीनची आवक सध्या चांगली वाढली आहे. आणि दुसरीकडे हमीभावापेक्षा तुरीला बाजारपेठेत जास्त दर मिळत. तूर उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे. मागच्या अनेक दिवसानंतर शेतमालाची आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरु झाली आहे.
सोयाबीन आणि तुरीच्या दरात सुधारणा झाली आहे, त्यामुळे सोयाबीन आंनी तुरीची आवक वाढली आहे. बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 500 ते 4 हजार 600 असा दर मिळत आहे. तर हमीभाव केंद्रावर 5 हजार 230 असा दर ठरवून देण्यात आला आहे. तसेच हरभऱ्याला हमीभावपेक्षा कमी दर आहे तरी हरभऱ्याची विक्रमी आवक होत आहे. राज्यात हरभरा खरेदी केंद्रही सुरु झाली आहेत. केंद्रावरील किचकट प्रक्रिया आणि पैशासाठी होणारा विलंब यामुळे नुकसान होत असतानाही शेतकरी खुल्या बाजारातच विक्री करीत आहे.
नाफेडच्यावतीने राज्यात खरेदी केंद्र सुरु –
नाफेडच्यावतीने राज्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. ही खरेदी केंद्र खरीप हंगामातील तुरीसाठी व रब्बी हंगामातील हरभऱ्यासाठी उभारण्यात आली आहेत. तुरीच्या उत्पादनावर होऊनही सध्या हमीभावापेक्षा बाजारपेठेत तुरीला चांगला दर आहे. हंगामाच्या सुरवातीला तुरीला 5 हजार 800 रुपये क्विंटल असा दर होता आणि आता 6 हजार 400 रुपये दर झाला आहे. हमीभाव केंद्रावर नाफेडच्यावतीने 6 हजार 300 रुपये दर आकारण्यात आलेला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
