Share

ब्रिटनने रशियाचे विमान पकडले; रशियन विमानांवर बंदी

Published On: 

🕒 1 min read

ब्रिटन: रशिया युक्रेन युद्धा दरम्यान ब्रिटनने रशियाचे एक विमान ताब्यात घेतले आहे. त्यामुळे युद्धाचा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या वाहतूक मंत्र्यांनी हे विमान पकडल्याचे सांगितले आहे. ब्रिटनने आधीच घोषणा केली होती कि जर रशियन विमाने, चार्टर्ड विमाने ब्रिटनच्या हवाई हद्दीत घुसली तर तो गुन्हा मानण्यात येईल आणि तात्काळ ते विमान जप्त करण्यात येईल.

रशियाने युद्ध सुरु केल्यानंतर ब्रिटनने रशियाच्या विमानांवर बंदी घातली होती. काही लोकांनी त्यांची चार्टर्ड विमाने ब्रिटन मध्ये येणाऱ्या इतर देशांमध्ये नोंदणीकृत केली होती. त्याही विमानांना ब्रिटनमध्ये येण्यास बंदी घातली होती. याच बंदीच उल्लंघन केल्यामुळे हे विमान जप्त करण्यात आलं आहे. हॅम्पशायर मधल्या फर्नबॅरो विमानतळावर या विमानाची तपासणी सुरु असताना हे विमान लॅक्झेमबर्गमध्ये नोंदणी केलेलं आहे परंतु याचा मालक रशियन असल्याचं निदर्शनास आल्याने हे विमान जप्त करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!