मुंबई: नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानावर भाजपने आंदोलन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान यात भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पुष्पाचा डायलॉग म्हणत एकदमच वातावरण गरम केले.
“ज्या देशाचा देशभक्त दहशतवादाला विसरतो तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही. १९९३ बॉम्बस्फोटात कोणी हात गमावला, कोणी पाय गमावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता प्रिय आहे. ही फक्त सत्तेसाठी विचार करणारी लोक आहेत. आमच्या पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे पण आम्ही आता फ्लावर नही फायर होणार…”, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी मविआ नेत्यांना टोला लगावला.
दरम्यान पोलिसांनी हा मोर्चा अडवून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप आमदार आशिष शेलार तसेच इतर प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले आहे. भाजपकडून आम्ही झुकणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र आता या आंदोलनचे तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का, हा महत्वाचा गोलंदाज आयपीएल २०२२ मधून होणार बाहेर?
-
गृहमंत्री उद्या देणार फडणवीसांच्या आरोपांना उत्तर; काय असेल राज्यसरकारचे स्पष्टीकरण?
-
‘दाऊदच्या दलालांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’; आशिष शेलारांचा इशारा
-
IPL 2022: दीपक चहरच्या पुनरागमनाबाबत मोठी उपडेट; या तारखेला चेन्नई संघाशी जुळणार!
-
‘ते’ संभाषण खरे की खोटे शरद पवारांनी सांगावे; भातखळकरांचे आव्हान

