🕒 1 min read
मुंबई: माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीने नुकतेच एक मोठे वक्तव्य केले आहे. ज्यात तिने “क्रिकेटरची बायको म्हणून जगणे कठीण होते” असे सांगितले आहे. तिने यावेळी एका क्रिकेटरच्या बायकोला कोणकोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागते, यावरही उघडपणे मत मांडले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्यांच्या संघातील खेळाडूंच्या पत्नींसह एक चर्चा घडवून आणली. ज्यात साक्षी धोनीने (sakshi dhoni) हे मोठे वक्तव्य केले आहे. तिने सांगितले ” तुमचे लग्न झाल्यावर आणि तुमचा नवरा ऑफिसला गेल्यावर सामान्य जीवन बदलते. पण आमचे नवरे खेळ खेळायला जातात. त्यामुळे मला वाटते की तुम्ही त्यांच्या अपेक्षांनुसार जुळवून घ्यावे आणि बदलावे लागते तेही त्यांच्यावर ताण न येऊ देता.”
साक्षीने पुढे त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितले “तुमच्याकडे तुमची खाजगी जागा उरत नाही आणि तुम्ही नेहमीप्रमाणे कॅमेरासमोर असू शकत नाही. काही लोक कॅमेर्यासमोर आरामदायक असतात, परंतु काही नाहीत. विशेषत: जेव्हा ते लोकांसमोर येते तेव्हा ते तुमच्यावर प्रश्न उपस्थित करण्यास तयार असतात. कधी कधी असं होतं की तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवत असतानाही लोक तुमच्याबद्दल बोलू लागतात.” साक्षी आणि माहीचे लग्न २०१० मध्ये झाले होते. तेव्हापासून साक्षी त्याच्यासोबत प्रत्येक प्रसंगात सोबत दिसते. विशेषतः आयपीएलमध्ये ती धोनीला चेअर करण्यासाठी नेहमी स्टॅन्डमध्ये असते.
महत्वाच्या बातम्या
- समांथाने लग्नाची ‘ती’ साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला केली परत…
- “आम्ही आता फ्लॉवर नही फायर होणार”, सुधीर मुनगंटीवारांचा पुष्पा स्वॅग
- “…बॉम्बस्फोटाच्या जखमा अजूनही ताज्या”- आशिष शेलार
- ऋषभ पंतबद्दल माजी क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी, म्हणाला तो लवकरच…
- अश्विनला रोहितने महान म्हटल्यावर माजी पाकिस्तानी खेळाडूचे वक्तव्य; म्हणाला “त्याची जीभ घसरली”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
