नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटर सबा करीम यांनी भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पंत चांगला खेळाडू आहे.
करीम यांच्या म्हणण्यानुसार “थोड्याच दिवसात पंत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एक जबरदस्त खेळाडू बनेल. ते एका पॉडकास्टमध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपण पाहत आहोत, की पंत एक चांगला परिपक्व खेळाडू बनला आहे. संघात त्याचे खूप महत्व आहे.
माझ्या मते त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अजून थोडे लक्ष दिले पाहिजे. त्याने आतापर्यंत खूप काही मिळवले आहे. लवकरच तो तिन्ही प्रकारात संघात आपले स्थान निर्माण करेल.”
रिषभ पंतने आतापर्यंत २४ वनडे सामन्यात ३२.५० च्या सरासरीने ७१५ धावा केल्या आहेत. तर ४३ टी२० सामन्यात ६८३ धावा केल्या आहेत. २९ कसोटी सामन्यात ४०.६० च्या सरासरीने १८३१ धावा केल्या आहेत. तर नाबाद १५९ ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.
महत्वाच्या बातम्या :


