🕒 1 min read
मुंबई: आयपीएल स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस असताना चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने त्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. धोनीने यंदाचे कॅम्प सुरत येथे हलवले आहे. चेन्नईच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला गेलाय ज्यात खेळाडू पिवळ्या जर्सी मध्ये क्रिकेट नव्हे तर “फुटवॉली” खेळाचा आनंद घेताना दिसत आहेत.
चेन्नई सुपर किंग्सच्या (chennai super kings) ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याखाली त्यांनी कॅप्शनमध्ये लिहले “सगळ्यांचं आवडतं फूटव्हॉली सेशन परत सुरु झालाय” चेन्नईचा कर्णधार धोनीची (ms dhoni) ही वेगळी शैली आहे. क्रिकेट सुरु करण्याआधी विरंगुळा म्हणून खेळाडूंना घेऊन फुटबॉल किंवा इतर खेळ खेळणे. भारतीय क्रिकेट संघात सामना सुरु व्हायच्या आधी प्रॅक्टिसमध्ये फुटबॉल खेळण्याची प्रथा धोनीमुळेच सुरु झाली. यावर बरीच टीका सुद्धा झाली कारण कधी खेळाडू यामुळे दुखापतग्रस्तही झाले आहेत. धोनीने मात्र आपली आवड अजूनही जोपासत आहे.
Namma Special ???? Footvolley segment is B⚽CK! ????#WhistlePodu pic.twitter.com/pXxIe994sG
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 7, 2022
आयपीएल स्पर्धेची सुरुवात २६ मार्चपासून होत आहे. या स्पर्धेचा पहिलाच सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता यांचा आहे. यंदा आयपीएल मुंबई आणि पुणे या दोनच शहरात खेवल जाणार आहे. ज्यात ४ स्टेडियमवर सामने खेळले जातील. गतविजेता चेन्नई यावेळीही जेतेपद राखण्यासाठी मैदानावर उतरेल.
महत्वाच्या बातम्या
- CID मधील दयाची मराठी चित्रपटात एंट्री…! दिसणार एका महत्त्वपूर्ण भूमिकेत
- नितेश राणेंच्या ‘त्या’ आरोपानंतर राहुल कनाल यांची दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- “…मागणी ‘लुच्चा’ मंत्र्याने केली होती”, आशिष शेलारांचा मलिकांवर अप्रत्यक्ष निशाणा
- BREAKING: देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी केली अटक
- नवीन ICC Test Ranking जाहीर; सर जडेजा अव्वल स्थानी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
