Share

WTC सुरु असताना सामना ड्रॉ केल्यामुळे क्रिकेट रसिक संतापले; पॅट कमिन्सने दिली मोठी प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पाकिस्तान दौरा सुरु आहे. ज्यात कसोटी मालिकेच्या पहिल्या सामना अनिर्णित राहिला आहे. WTC क्रमवारीत या सामन्याचे महत्व असूनही संघानी ड्रॉ साठी खेळणे क्रिकेट रसिकांना पचनी पडले नाही. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यावर आता कर्णधार पॅट कमिन्सने रावळपिंडी येथे अनिर्णित ड्रॉवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

पॅट कमिन्स (pat cummins) म्हणाला “मला वाटते की खेळाडूंना नेहमीच बॅट आणि बॉलमध्ये सारखी लढाई हवी असते आणि मला वाटते की कसोटी क्रिकेट सर्वोत्तम आणि सर्वात फायद्याचे आहे. “खेळपट्टीबद्दल सांगायचे तर ती पारंपारिक खेळपट्टी नव्हती. तुम्ही रावळपिंडी मध्ये खेळत असाल आणि सामना ड्रॉ झाला तरी हे वाईट नाहीये.” सामना निकालाविना संपला तेव्हा पाकिस्तानने दुसऱ्या डावात बिनबाद २५२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने पहिल्या डावात ४७६-४ धावा घोषित केल्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४५९ धावा केल्या.

१९९८ नंतर पाकिस्तानच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाची ही पहिली कसोटी होती. पहिल्या कसोटीच्या अंतिम दिवशी पाकिस्तानच्या सलामीवीरांचे वर्चस्व होते, इमाम-उल-हकने सामन्यातील दुसरे शतक झळकावले आणि अब्दुल्ला शफीकने पहिले शतक झळकावले. हकने पहिल्या डावात १५७ धावा करत दुसऱ्या डावात १११ धावा केल्या, तर शफीकने १३६ धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!