🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनिलिया देशमुख यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. रितेश आणि जेनिलिया हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. रितेशने नुकताच हे एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CauF5XMgSxd/?utm_medium=copy_link
रितेशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.या व्हिडीओत रितेश पुस्तक वाचत असताना मागून आवाज येतो म्हणजे जिनिलिया पाठून बोलते की ती एका महिन्यासाठी तिच्या माहेरी जाते. यानंतर रितेशच्या आनंद हा शिगेला पोहोचतो. आनंदात रितेश डान्स करतो. तर व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘तेरी इसी अदा पर सनम मुझे प्यार आ गया’, हे गाणं प्ले होतं. हा व्हिडीओ शेअर करत ‘चलो डुएट करे’, असे कॅप्शन रितेशने दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
