Share

धमकी मेसेज प्रकरणी बोरिया मजुमदार यांचा साहावर उलट आरोप ; मानहानीचा दावा ठोकणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताचा यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने वैयक्तिक संभाषणात धमकी देणाऱ्या पत्रकाराशी केलेल्या संवादाचे तपशील उघड केले आहेत आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नियुक्त केलेल्या ३ सदस्यीय समितीच्या भेटीदरम्यान त्या व्यक्तीचे नाव देखील उघड केले आहे. ज्यात बीसीसीआयने नावाची सार्वजनिक घोषणा करण्याआधीच बोरिया मजुमदार यांनी स्वतःच तो पत्रकार असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले आहे.

शनिवारी (५ मार्चला) साहाने बीसीसीआयला (bcci) संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्यानंतर त्याच रात्री बोरिया मजुमदार (boria majumdar) यांनी स्पष्टीकरण देताना व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात त्यांनी साहाने (wriddhiman saha) स्क्रिनशॉट सोबत छेडछाड केल्याचा दावा केला आहे. आपण त्याला धमकी दिलीच नसल्याचे सांगत त्यांनी साहावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती दिली आहे.

https://twitter.com/BoriaMajumdar/status/1500155131458818051?s=20&t=xsogrSUtYPidtWMXeTj46Q

सध्या सुरू असलेल्या श्रीलंका मालिकेसाठी रिद्धिमान साहाला वगळण्यात आल्यानंतर हे सर्व प्रकरण सुरू झाले. साहाने नाराजी व्यक्त करताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत ड्रेसिंग रूममधील काही वर्गीकृत संभाषण उघड केले होते. तसेच साहाने हे देखील उघड केले की राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी त्याला सांगितले की ते आता त्याला संघात परत घेण्याचा विचार करत नाहीत. साहाची अलीकडेच बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतील गट क मध्ये पदावनत करण्यात आली आहे. एकणूच मैदानात शांत स्वभावाचा असलेला साहा आता मैदानाबाहेर अनेक मोठ्या वादांमध्ये अडकला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!