Share

Russia – Ukraine War: जो बायडेन आणि वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात रशिया युद्धाबाबत महत्वाची चर्चा 

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी आघाडीमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाचे लष्कर हे युक्रेनच्या लष्करापेक्षा कित्येक पटीने ताकदवान आहे. तरी युक्रेन रशियाच्या बलाढ्य लष्कराचा सामना करत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे एकटे रशिया विरुद्ध खिंड लढवत आहेत. रशियाचा पाडाव करण्यासाठी जगभरातील महत्वाच्या देशांकडून कशी मदत मिळेल याचा प्रयत्न सुद्धा वोलोडिमिर झेलेन्स्की करताना दिसत आहेत.

त्यातच आता युक्रेनने पाश्चिमात्य देशांकडे रशिया विरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे पुरवण्याची विनंती केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे रशियन बनावटीची लढाऊ विमान उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाश्चिमात्य प्रगत राष्ट्रांकडून आधुनिक शस्त्र न मिळाल्यास युक्रेनमध्ये रक्तपात आणखीन वाढण्याची शक्यता पण वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बोलून दाखवली आहे.

रशियाचे लष्कर युक्रेनच्या लष्करापेक्षा जास्त ताकदवान असले तरी प्रगत राष्ट्रांकडून मिळालेल्या काही आधुनिक शस्त्रांच्या मदतीने युक्रेनचे लष्कर रशियाच्या लष्कराला अनपेक्षित धक्के देत आहे. त्यातच काल रात्री अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात रशियावर अजून आर्थिक निर्बंध लावण्याबाबतीत चर्चा झाली. जो बायडेन यांच्याशी बोलताना “आम्ही युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या १० हजार पेक्षा जास्त सैनिकांचा खात्मा” केल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष  वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!