Share

Russia-Ukrain  War : युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची व्यथा ; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी संघटनेमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. हे युद्ध जरी युरोप खंडात चालू असले तरी या युद्धामुळे जगातील अनेक देशांना  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या युध्दाच्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे. भारत देश पण याला अपवाद नाही. भारतातून दरवर्षी अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घ्यायला जात असतात. युक्रेनमध्ये असणारे हे विद्यार्थी आणि बाकी नोकरीकरिता गेलेले भारतीय मोठ्या संख्येने युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.

युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गतच भारत सरकारमधील ४ मंत्री सुद्धा युक्रेनच्या शेजारील देशात पोहचले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीप सिंग पुरी, जनरल वी. के. सिंग आणि किरण रिजिजू हे मंत्री युक्रेन शेजारील देशात भारतीयांना मदत करावयास गेले आहेत.

अजूनही काही भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या विविध शहरात अडकले आहेत. सुमी या युक्रेनमधील महत्वाच्या शहरात अजूनही काही भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना अन्न तर सोडाच, पण साधं प्यायला पाणीही नसल्याने रस्त्यावर पडलेला बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत.सुमी या युक्रेनमधील शहरात अजूनही ९०० पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. सुमी शहरात अडकलेल्या या ९०० भारतीय विद्यार्थ्यांपैकीच एकाने भारतीय वृत्तवाहिन्यांशी बलताना आपबिती सांगिलती.

महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!