🕒 1 min read
नागपूर: वार्ड संरचना किंवा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे अधिकार राज्य सरकारचे होते. नंतर ती जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे देण्यात आली. आता आम्ही ओबीसी संदर्भात कायदा करून ते अधिकार पुन्हा राज्य सरकारकडे घेण्याच्या निर्णय करत आहे. असा कायदा झाल्यास वार्ड संरचना करणे, निवडणुकांच्या तारखा जाहीर करणे हे अधिकार राज्य सरकारला मिळतील, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेत. ते नागपूरात माध्यमांशी बोलत होते.
सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात या कायद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. कॅबिनेटने आधीच त्याला मान्यता दिलेली आहे. विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर कायदा लगेच अमलात येऊ शकेल. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ही विश्वासात घेऊ. आधी ही त्यांच्यासोबत ओबीसी आरक्षण संदर्भात त्यांचे सहकार्य घेतले आहे. यासंदर्भात ही आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असंही वडेट्टीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
विनोद कांबळीचा व्हिडीओ ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, हे बघून डोळ्यात पाणी येतेय
-
Train fire in Meerut : जीव वाचवण्यासाठी प्रवाश्यांनी लगावला ट्रेनला धक्का; पाहा धाडसी व्हिडिओ
-
IND vs SL: आर अश्विनच्या अर्धशतकावर ऋषभ पंतची मजेशीर रिऍक्शन; व्हिडीओ व्हायरल
-
सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांचा आगामी ‘टायगर ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
