🕒 1 min read
मेरठ : मेरठ रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाश्यांचे अनोखे धाडस बघायला मिळाले. मेरठमधील दौराला स्टेशनवर सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला अचानक आग लागली. (Train fire in Meerut ) आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र यात कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान या व्हिडिओमध्ये आग लागलेल्या डब्यातील प्रवासी तात्काळ बाहेर पडले आणि प्रवाशांनी एकजुटीने धक्के देत उर्वरित डब्यांना आगीपासून वाचवले आणि बाकीचे डबे वाचवले. दरम्यान सहारनपूर ते दिल्ली या ट्रेनच्या डब्यांना लागलेली आग इंजिनापर्यंतही पोहोचली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या मदतीने तात्काळ डबे इंजिनपासून वेगळे केले.
#WATCH | Uttar Pradesh: Fire broke out in engine & two compartments of a Saharanpur-Delhi train, at Daurala railway station near Meerut.
Passengers push the train in a bid to separate the rest of the compartments from the engine and two compartments on which the fire broke out. pic.twitter.com/Vp2sCcLFsd
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 5, 2022
तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत ही आग विझवली. दरम्यान मेरठ सिटी रेल्वे स्टेशनचे अधीक्षक आरपी शर्मा यांनी सांगितले की, दौरालाजवळ ट्रेनच्या एका डब्यात धूर येऊ लागला आणि त्यानंतर ट्रेन स्टेशनवर थांबवण्यात आली. मात्र अजुन आग नेमकी कशी लागली याचे कारण उघड झाले नाही.
महत्वाच्या बातम्या
- “पुणे जसं शिक्षणाचं माहेर घर आहे तसं युक्रेन…”; शरद पवारांनी सांगितल्या जून्या आठवणी
- “…तेव्हा राणेंना मंत्रिमंडळातून काढलं नाही”, मलिकांच्या राजीनाम्यावरून पवारांनी सुनावले
- “ते ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममधील एक मोठे रहस्य होते” अनिल कुंबळेने सांगितली वॉर्नसोबतची आठवण
- Russia-Ukraine War: दोन शहरात युद्ध थांबले; व्लादिमीर पुतीन यांचा महत्वाचा निर्णय
- IND VS SRI : सर जडेजाने मोहालीत रचला इतिहास, असा कारनामा करणारा दुसराच भारतीय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
