Share

IND vs SL: आर अश्विनच्या अर्धशतकावर ऋषभ पंतची मजेशीर रिऍक्शन; व्हिडीओ व्हायरल

Published On: 

मुंबई: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी मोहाली येथे खेळली जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी ऋषभ पंतचे शतक हुकले, तर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रवींद्र जडेजाने अप्रतिम शतक झळकावले. तसंच आर अश्विननेही अप्रतिम अर्धशतक झळकावले आहे. पहिल्या सत्रात बाद होण्यापूर्वी त्याने अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीचे केवळ चाहत्यांनीच नाही तर टीम इंडियाच्या कर्मचाऱ्यांनीही कौतुक केले. यादरम्यान ऋषभ पंत अश्विनच्या या खेळीचे वेगळ्या पद्धतीने कौतुक करताना दिसला. यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, जेव्हा रविचंद्रन अश्विनने (ravichandran ashwin) अर्धशतक पूर्ण केले तेव्हा प्रशिक्षक राहुल द्रविडपासून (rahul dravid) ते गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुणपर्यंत, डगआउटमध्ये उपस्थित असलेल्या संपूर्ण स्टाफने त्याचे कौतुक केले. त्यांचे उत्साह वाढवले. त्याचवेळी ऋषभ पंतही (rishabh pant) डगआऊटमध्ये होता आणि त्याने तेथे उपस्थित व्हिडिओ विश्लेषक हरी प्रसादचे दोन्ही हात वरती धरत त्यांना टाळ्या वाजवायला लावल्या.

पहिल्या डावात शतक हुकल्याने निराश झालेला ऋषभ पंत दुसऱ्या दिवशी त्याच्या नेहमीच्या रंगात आलेला दिसला. पंतचा मस्ती करताना हा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल असून चाहत्यांना खूप आवडतो आहे. भारतीय संघाने आपली पहिल्या डावाची फलंदाजी संपवली आहे. त्यांनी ५५२ धावा करत डाव घोषित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!