Share

युक्रेनमधून आलेल्या मुलांना मंत्र्यांने द्यायला लावल्या ‘मोदी जिंदाबाद’च्या घोषणा; बहुतेकांनी पाळले मौन 

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : संकटग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. त्यांनी या मुलांना ‘मोदीजी जिंदाबाद’ म्हणायला लावले. मात्र, बॅचमधील बहुतांश मुलांनी चुप्पी साधली. त्यामुळे अजय भट्ट यांनी स्वताच जिंदाबाद म्हणात काढता पाय घेतला. दरम्यान, मायदेशी परतलेल्या एका मुलीने प्रसारमाध्यमांना सांगितले की, आपण स्वत:च्या प्रयत्नानेच देशात येऊ शकलो, अशा स्थितीत सरकारने श्रेय घेऊ नये.

युक्रेनमधून भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी मोदी सरकारने मिशन गंगा हाती घेतले आहे. मोदी सरकार याचा राजकारणासाठी वापर करत असल्याची टीका देखील होत आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर आलेल्या भारतीय हवाई दलाच्या चौथ्या विमानातील विद्यार्थ्यांशी मंत्री अजय भट्ट यांनी संवाद साधला. सर्वांचे स्वागत करताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

गुरुवारी सकाळी झालेल्या या संवादादरम्यान भट्ट यांनी भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांचेही कौतुक केले. तसे, त्यांनी आपल्या भाषणाच्या जास्तीत जास्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान केले. ते म्हणाले, “जर पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मिळाले नसते, तर आज काय झाले असते माहीत नाही…”. सुमारे पाच मिनिटांच्या संपूर्ण भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मोदीजींच्या प्रयत्नांमुळे मुलांचे प्राण वाचले आहेत आणि सर्व काही ठीक होईल. त्यानंतर त्यांनी भारत माता की जय आणि मोदीजी जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

दरम्यान, पश्चिम युक्रेनमधील वसतिगृहाच्या खोलीत आणि बंकरमध्ये अडकलेल्या 22 वर्षीय अनिमेश मिश्रा म्हणाले, “सरकार पश्चिमेकडील लोकांना आणत आहे, जे आधीच सुरक्षित आहेत. जे सीमेवर पोहोचले आहेत, ते स्वबळावर पोहोचले आहेत. त्याला मदत करायला तिथे कोणीच नव्हते.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!