Share

खासदार संजय राऊत नवाब मलिकांच्या घरी दाखल

Published On: 

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांना अटक केल्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. त्याच सोबत यात भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधीमंडळाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत असतानाच आज शिवसेना खासदार संजय राऊत हे नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी संजय राऊत नवाब मलिक त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक, मुलगी सना खान, बहीण नगरसेविका सईदा खान यांच्या सह सर्व कुटुंब इथे उपस्थित आहे.तर संजय राऊत यांच्यासह त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत हे उपस्थित आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!