Share

व्हीव्हीएस लक्ष्मणने विराटच्या १००व्या कसोटी सामन्यासाठी जाहीर केली इच्छा म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध सामना होत असताना १०० कसोटी सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा विराट कोहली हा १२ वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. माजी भारतीय कर्णधार विराट या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेदरम्यान त्याची १०० वी कसोटी खेळणार होता, परंतु नशिबाप्रमाणे त्याने आज मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर उपस्थित असलेल्या ५० टक्के गर्दीसह भारतातच मैलाचा दगड गाठला आहे.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड (rahul dravid) , सौरव गांगुली आणि दिलीप वेंगसरकर यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेट दिग्गजांनी विराट कोहलीला या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यात व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) ज्याने विराटच्या (virat kohli) सुरुवातीच्या दिवसात त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर केला आहे त्याने विराटकडे एक विशेष मागणी केली आहे. तो म्हणाला ” ही १०० वी कसोटी संस्मरणीय बनवा. मला शंका नाही की तु मैदानावर जाऊन मजा करशील , व्यक्त होशील आणि कदाचित तुला शंभर मिळेल! १०० व्या कसोटी सामन्यात फारशा भारतीयांनी शतक झळकावलेले नाही आणि मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. मला यात शंका नाही की तु देशासाठी गौरव मिळवत राहशील आणि अनेक तरुण भारतीयांना प्रेरणा देशील. तू आम्हाला गर्वांकीत करत राहशील”

श्रीलंका विरुद्ध कसोटी सामना सुरु झाला आहे. विराट कोहलीचा १००वा कसोटी सामना पाहता यावा यासाठी चाहत्यांनी आवाहन केल्यानंतर बीसीसीआयने या ऐतिहासिक क्षणाला विराटचे चाहते त्याला प्रत्यक्ष पाहू शकतील याचीही परवानगी दिली. सामना सुरु होण्याआधी बीसीसीआयकडून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराटचा सत्कार केला आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण सारखेच भारतीय क्रिकेट रसिकांनाही विराटच्या शतकाची आशा आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!