नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या एका खेळीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. विराटच्या १०० व्या सामन्याआधी रोहितला विचारले की, विराटची सर्वात भारी खेळी कोणती. त्यावर रोहित म्हणाला की २०१३ ला साउथ आफ्रिकेमध्ये केलेली शतकीय खेळी मला सर्वात आवडली.
तो म्हणाला की, या सामन्यात खेळपट्टीवर खेळणे खूप कठीण होते. चेंडू खूप उसळी घेत होता. या सामन्यात आमच्यातील बरेच जन आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी खेळत होते. त्यावेळी मोर्ने मोर्केल, डेल स्टेन, वर्नेन फिलैंडर आणि जॅक कॅलिस सारख्या दिग्जांचा सामना करणे सोपे नव्हते.
परंतु विराटने ज्याप्रकारे फलंदाजी केली ती शब्दात व्यक्त करण्यासारखी नाही. त्याने पहिल्या डावात शतक ठोकले तर दुसऱ्या डावात ९० धावा केल्या होत्या. त्यामुळे माझ्यामते त्याची ही सर्वश्रेष्ठ खेळी होती.
पुढे तो म्हणाला की, एक खेळाडू म्हणून माझा सर्वात आवडता क्षण २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकलेली कसोटी मालिका आहे. ही मालिका खूप जबरदस्त झाली होती. या मालिकेत विराट कर्णधार होता.
महत्वाच्या बातम्या :

