🕒 1 min read
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) गेल्या नऊ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियन लष्कराने युक्रेनमध्ये अनेक शहरांमध्ये बॉम्बहल्ले केले आहेत, त्यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. नाटोच्या (NATO) दबावाला देखील रशियाने झिडकारले आहे. त्यामुळे या युद्धामुळे जगभर तनाव निर्माण झाला आहे. अशातच आता हे युद्ध संपवण्यासाठी चर्चा देखील केल्या जात आहेत. या साठी रशियाने देखील तयारी दाखवली आहे.
युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी चर्चा करण्यास रशिया तयार आहे, मात्र युक्रेनची लष्करी आधारभूत संरचना नष्ट करण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅवरॉव्ह यांनी म्हटले आहे. पाश्चिमात्य देशांनी कायम युक्रेनला शस्त्रपुरवठा केला आहे, त्याच्या फौजांना प्रशिक्षण दिले आहे आणि युक्रेनचे रूपांतर रशियाविरोधी तटबंदीत करण्यासाठी तेथे तळ बांधले आहेत, असा आरोप लॅवरॉव्ह यांनी केला.
तसेच रशियाला असे वाटत आहे की युक्रेनला केल्या जाणाऱ्या या शस्त्र पुरवठ्यामुळे रशियाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळेच हे युद्ध करण्यात येत आहे. मात्र नाटो ही संरक्षणात्मक आघाडी असून, तिच्यामुळे रशियाला कुठलाही धोका उद्भवत नाही, असे अमेरिका व त्याच्या मित्रराष्ट्रांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
IND vs SL: रोहित शर्माने सांगितले विराटने केलेले त्याच्या आवडीचे कसोटी शतक
-
SWAG! केंद्रीय मंत्री दानवे आणि कपिल पाटलांची क्रिकेटच्या मैदानावरही तुफान फटकेबाजी
-
IND vs SL: विराटच्या १००वा कसोटी सामना पाहण्यासाठी स्टेडियम झाले हाऊसफुल!
-
IND vs SL: भारताचा श्रीलंका विरुद्ध पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार ; विराट कोहलीसाठी ऐतिहासिक दिवस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
