Share

वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला जाण्याची गरज नाही; आनंद महिंद्रांचं मोठं ट्विट

Published On: 

मुंबई : रशिया युक्रेन युद्धामध्ये युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. जीव मुठीत घेऊन हे विद्यार्थी मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 18 हजार इतकी आहे. परंतु भारतात वैद्यकीय शिक्षण उपलब्ध असतानाही हे विद्यार्थी युक्रेनला जाऊन शिक्षण का घेत आहेत? असा प्रश तुम्हाला देखील पडला असेल. याच उत्तर आहे कि महाविद्यालयात एमबीबीएससाठीच्या जागा कमी आहेत. याच प्रश्नाकडे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

महिंद्रा हे नेहमीच समाजातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतात. यावेळी त्यांनी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून त्यांच्या नवीन ड्रीम प्रोजेक्ट बद्दल ट्विट करत माहीती दिली आहे.

महिंद्रा युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण सुरू करणार

भारतातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी कोणकोणत्या देशांना प्राधान्य देतात याची यादी त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर याआधी आपल्याला भारतात महाविद्यालयांच्या कमतरतेची माहिती नव्हती असेही त्यांनी सांगितले. या ट्विटमध्ये त्यांनी महिंद्रा युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण संस्थेची स्थापना करता येऊ शकते का असे विचारत, टेक महिंद्राचे एम डी आणि सीईओ सी. पी. गुरनानी यांना टॅग देखील केले आहे.

कमी फीमध्ये मिळणार शिक्षण

या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी महिंद्रा यांना भारतातील शिक्षण खूप महाग असल्याचे सांगितले. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण भारतापेक्षा स्वस्त आहे. यामुळेच विद्यार्थ्यांना युक्रेनला जाण्याची गरज पडत आहे. त्यामुळे तुम्ही तरी तुमच्या महाविद्यालयाची फी कमी ठेवा, असे एका युझरने ट्विट केले. ज्याची महिंद्रा यांनी दखल घेत नोटेड असा रिप्लाय दिला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!