🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री रेणुका शहाणे मागचा बराच काळ छोट्या पडद्यापासून दूर आहेत. मात्र त्या सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग असलेल्या रेणुका शहाणे लवकरच झी मराठीवरील एका कार्यक्रमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
या कार्यक्रमात त्या एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो प्रसारित झाला. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. ‘बँड बाजा वरात’ या झी मराठीवरील आगामी कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांना सुरुवाती पासूनच खूप उत्सुकता होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कोण? हा कार्यक्रम कधी भेटीला येणार? हे आणि असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होते आणि नुकतंच एका नवीन प्रोमो सोबत या सगळ्या प्रश्नाची उत्तरं प्रेक्षकांना मिळाली आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेता पुष्कराज चिरपुटकर सांभाळणार असून हा कार्यक्रम १८ मार्च पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या कार्यक्रमातून लग्नघरातील नववधू-वारांना झी मराठी कडून भरघोस आहेर मिळणार आहे. नुकतंच वाहिनीवर रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये रेणुका शहाणे झी मराठीकडून जबरदस्त आहेर लग्न घरात सप्रेम भेट म्हणून घेऊन जाताना दिसत आहेत. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम लग्नघरातील धूम अनुभवण्यासाठी सज्ज झाला आहे तेव्हा प्रेक्षक सुद्धा मनोरंजनाच्या भरघोस आहेरासाठी तयार असतील यात शंकाच नाही.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
