🕒 1 min read
मुंबई: मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. मलिक यांच्या कोठडीची मुदत आज म्हणजेच ३ मार्च रोजी संपत असून, मुदत वाढवण्याबाबत आज न्यायालयात सुनावणी झाली. ईडीच्यावतीने अनिल सिंग यांनी तर नवाब मलिकच्या वतीने अमित देसाई आणि तारक सय्यद यांनी युक्तिवाद केला.
विशेष न्यायालयात सुनावणी सुरू करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग म्हणाले की, ईडीच्या कोठडीत असताना नवाब मलिक यांची प्रकृती अस्वस्थ्य असल्यामुळे त्यांना काही काळ रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यामुळे पूर्ण चौकशी करणे शक्य झाले नाही. यावेळी ईडीकडून 6 दिवसांच्या रिमांडची मागणी करण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, आरोपीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ईडीने पूर्ण चौकशी केली नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे निर्देश दिले.
या आधी सुनावणीदरम्यान अनिल सिंह म्हणाले, आम्ही हसीना पारकर यांच्या मुलाचे साक्ष कोर्टाला दिली आहे, त्याशिवाय तुरुंगात असलेल्या आरोपीची साक्षही कोर्टात सोपवण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती आम्ही आत्ता जाहिररीत्या सांगू शकत नाही. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेकांच्या चौकशीबरोबरच व्यवहाराची माहिती आणि तपास करावा लागणार आहे. यात बऱ्याच जणांचा सहभाग आहे तसेच मूळ मालकाला पैसे दिलेले नाहीत, अशा अनेक बाबी समोर आल्या आहेत.
यावर नवाब मलिक यांची बाजू मांडणारे वकील अमित देसाई म्हणाले की, हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिल्याचा आरोप करून त्याला टेरर फंड म्हटले होते, पण. आज ईडी म्हणते की मागच्या वेळी ५५ लाख रुपयांची चर्चा ही टायपिंग मिस्टेक होती आणि ती फक्त ५ लाख रुपये आहे, मात्र या अर्जाच्या आधारे मलिक यांना ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले. कोणालाही अटक करण्यापूर्वी वीस वेळा विचार करावा, सर्व पुरावे गोळा केल्यानंतरच कोणतीही कारवाई करावी. ईडीला गृहपाठ करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचं खोबरं करायचं ठरवलंय’ – डॉ. प्रकाश आंबेडकर
-
कृषी विभागाकडून हरभऱ्याची उत्पादकता जाहीर, शेतकऱ्यांच्या मालाला मिळणार योग्य हमीभाव
-
Crime Suspense आणि Bold Scenesचे कॉकटेल; ‘हे’ पाच चित्रपट आणि वेबसीरिझ तुम्ही पाहिले का?
-
राहणे आणि पुजाराबद्दल रोहित शर्माचे मोठे वक्तव्य! म्हणाला, भविष्यात….
-
युद्ध थांबण्याची शक्यता लांबणीवर; रशियाशी चर्चेला युक्रेनने दिला नकार..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
