🕒 1 min read
मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जेव्हा मोहाली येथे १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. यासोबतच तो दिग्गजांच्या यादीत समाविष्ट होणार आहे. या सामन्याआधी वाद विसरत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांतील योगदानाबद्दल कोहलीचे कौतुक केले.
सौरव गांगुलीने (sourav ganguly) विराटची (virat kohli) प्रशंसा करत सांगितले “सुरुवातीला, तिथ पर्यंत पोहचण्यासाठी तुम्ही खूप चांगले खेळाडू असणे आवश्यक आहे. भारतीय क्रिकेटमध्ये फार कमी लोकांनी १०० कसोटी सामने खेळले आहेत. तो एक विलक्षण लँडमार्क आहे. विराट हा महान खेळाडू आहे. तुम्ही या स्तरावर खेळता तेव्हा अपेक्षा नेहमीच असतील. मी वेगवेगळ्या पिढ्यांची तुलना करत नाही. पण त्याने कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी केली आहे, मग ती कसोटी सामन्यांमध्ये क्रमांक ४ असो किंवा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये क्रमांक ३ असो, त्याने अप्रतिम फलंदाजी केली आहे.”
२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यावर कोहलीला कठीण काळ सहन करावा लागला होता, मात्र विराटने पुनरागमन करत खेळ बदलला. गांगुलीने त्या काळातील कोहलीच्या वर्चस्वाची तुलना २००२ ते २००५ या काळात राहुल द्रविडच्या वर्चस्वाशी केली. “त्याची टेक्निक , त्याची सकारात्मकता, त्याचे फूटवर्क, त्याचा तोल… मला हे सर्व आवडते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विराटने २०१४ नंतर इंग्लंडमध्ये संघर्ष करताना ज्या पद्धतीने आपला खेळ बदलला. मी ती कसोटी मालिका पाहिली कारण मी तिथे समालोचक म्हणून काम करत होतो. आणि त्यानंतर त्याची पाच वर्षे उल्लेखनीय होती. साधारणपणे असेच घडते. मी ते राहुल द्रविडसोबत (rahul dravid) २००२ ते २००५ दरम्यान पाहिलय. तुम्ही महान खेळाडूंना त्यांच्या शिखरावर असताना हे टप्पे पार करताना दिसतात. सचिनकडे बरेच होते,” अशा शब्दात सौरव गांगुली यांनी विराट कोहलीचे तोंड भरून कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आदळ आपट करून वादळी अधिवेशन होत नाही’ – संजय राऊत
- सोन्याचे दर १ हजाराने महागले तर चांदीचा ‘हा’ आहे दर; Russia-Ukraine युद्धाचा मोठा प्रभाव
- State Budget Session 2022 : यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल- अजित पवार
- IPL 2022 : धोनीपुढं मोठं संकट..!CSKचा प्रमुख खेळाडू होणार स्पर्धेबाहेर?
- ‘मदत आणि स्वागत करा राजकारण नको’ – मनोज कोटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
