Share

“… आणि आम्ही ४ तास गप्पा मारल्या” विराट कोहलीसोबत भेटीच्या आठवणींचा जेमिमाहने केला खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा सल्ला युवा क्रिकेटपटूंसाठी अमूल्य मानला जातो. तो नेहमी आपल्याकडे असलेले ज्ञान युवा खेळाडूंसोबत शेअर करत असतो. अशीच एक घटना भारतीय महिला संघाची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स हिने नुकतीच सांगितली आहे. ज्याने ती आणि स्मृती ,मंधाना कोहलीला न्यूझीलँडच्या हॉटेलमध्ये कसे भेटले आणि चार तास गप्पा मारल्या याबद्दल सांगितले.

जेमिमाहने (jemimah rodrigues) विराट सोबतची आठवण रणवीर अह्लाबादियाला (beerbiceps) दिलेल्या मुलाखतीत सांगितले “स्मृती आणि मला त्याच्याशी बोलण्याची संधी मिळाली. आम्ही त्याला विचारले होते की ‘विराट भैया (virat kohli) आम्हाला तुमच्याशी फलंदाजीबद्दल बोलायचे आहे. भेटू का?’. आम्ही न्यूझीलँडमध्ये एकाच हॉटेलमध्ये होतो. तो ‘हो नक्की या’ असे म्हणाला. म्हणून त्याने आम्हाला कॅफेमध्ये बोलावले आणि अनुष्का शर्माही (anushka sharma)  तिथे होती. आम्ही त्याला काही मिनिटांसाठी विचारले होते पण आम्ही चार तास बोललो. आम्ही अर्धा तास फलंदाजीबद्दल बोललो पण त्यानंतर ती सामान्य गोष्टींबाबत गप्पा मारल्या”

यावेळी जेमिमाहने विराटने दिलेल्या एका विशिष्ट सल्ल्याबाबत देखील सांगितले. “मी त्याला अपेक्षा कशा हाताळायच्या याबद्दल विचारले ‘तू विराट कोहली आहेस. जर तु पन्नास धावा केल्या असतील, तर तु लोकांसाठी कमी कामगिरी केली आहे. मग तु ही अपेक्षा कशी हाताळशील ?’ तो म्हणाला, ‘माझ्यासाठी प्रत्येक वेळी मी मैदानावर असतो तेव्हा मी फक्त धावफलक पाहतो आणि त्यावर लक्ष केंद्रित करतो. तसे कर आणि गर्दीवर लक्ष केंद्रित करू नको आणि भारताला जिंकण्यासाठी मी काय करू शकतो यावर लक्ष ठेव. जर मी या अपेक्षांना महत्त्व देणे थांबवले आणि फक्त प्रक्रियेकडे पाहिले तर परिणाम आपोआप मिळतील.” जेमिमाहला अलीकडेच यंदाच्या महिला विश्वचषक संघातून वगळण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!