Share

“स्वतःचे तोंड लपवण्यासाठी विरोधक विधिमंडळात गोंधळ घालणार”, संजय राऊतांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भूमिका मांडली. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच स्वतःचे तोंड लपवण्यासाठी विरोधक विधिमंडळात गोंधळ घालणार असल्याचेही राऊत म्हणाले आहेत.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘खरे तर असे अनेक विषय वादळी आहेत व त्यावर विधिमंडळात चर्चा होणे गरजेचे आहे. १२ बेशिस्त सदस्यांचे निलंबन, विधानसभा अध्यक्षांची निवड हे विषय ओघाने येतील व जातील, परंतु विरोधकांना स्वतःचे तोंड लपवायचे आहे म्हणून ते विधिमंडळात गोंधळ घालणार असतील तर त्यास वादळ म्हणता येणार नाही. फार तर त्यास आदळआपट म्हणावी लागेल.’ विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन गाजेल, वाजेल किंवा वादळी ठरेल, अशी हूल विरोधी पक्षांतर्फे उठवली जात आहे. त्यात अजिबात तथ्य दिसत नाही. विरोधी पक्षांच्या लोकांनी आरोपांची राळ उडवायची व त्यातून वादळ उभे करायचे दिवस आता राहिलेले नाहीत. कारण विरोधकांचे आरोप द्वेषपूर्ण असतात. त्यामुळे ते आपटीबारही ठरत नाहीत. असे फुसके बार काय वादळ उठवणार? , असा खोचला सवालही राऊतांनी केला आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘विरोधी पक्षांनी सभागृहात विधायक चर्चेला तोंड पह्डावे अशी अपेक्षा आहे, पण ‘१०५’चा आकडा असूनही सत्ता गमावली हे शल्य उराशी बाळगून विरोधी पक्ष “आता माझी सटकली” या मानसिकतेतून काम करीत आहे. त्यात ना राज्याचा फायदा ना विरोधी पक्षाचा. महाराष्ट्रापुढेच नव्हे, तर देशापुढे नव्या प्रश्नांचा डोंगर उभा राहिला आहे. युक्रेन-रशिया युद्धात महाराष्ट्राची मुलेही अडकून पडली आहेत. महाराष्ट्रातील त्यांचे पालक हवालदिल झाले आहेत. त्यांच्या मदतीसाठी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. लढाई सुरू झाली त्यात आपल्या विद्यार्थ्यांचा काय दोष? पण केंद्रातले सरकार गंगाकिनारी निवडणूक प्रचारात अडकून पडले व संकटाबाबत केंद्राला उशिरा जाग आली. त्याचा फटका हजारो हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना बसला. त्यात महाराष्ट्राचेही विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी अशा पद्धतीने कोणाच्या हलगर्जीपणामुळे अडकून पडले यावर विधिमंडळात चर्चा व्हायला हवी.’

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!