Share

संघातून बाहेर असलेल्या हार्दिक पंड्याला बीसीसीआयकडून धक्का, करारात A मधून C मध्ये हकालपट्टी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बीसीसीआयने नुकतेच भारतीय खेळाडूंचे नवीन करार जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांच्या श्रेणीही ठरवण्यात आल्या आहेत. बडोदा आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) च्या केंद्रीय करार यादीत पदावनत करण्यात आले आहे. ICC T20 विश्वचषक २०१९ पासून हार्दिक भारतीय संघाबाहेर आहे, जिथे तो फक्त फलंदाज म्हणून खेळला आणि त्याला गोलंदाजी करण्याची संधीही कमी मिळाली.

बीसीसीआयने त्याच्या श्रेणीत घसरण केल्यामुळे हार्दिकला (Hardik pandya) मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याच्या मानधनात ४ कोटी रुपयांची कपात झाली आहे. BCCI च्या चार श्रेणी आहेत , A+ ज्यांचे वार्षिक मानधन ७ कोटी रुपये आहे तर A, B, आणि C श्रेणींचे मूल्य अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी आणि १ कोटी रुपये आहेत. आता श्रेणीत घसरण झाल्यामुळे हार्दिकला ५ ऐवजी १ कोटी रुपये मिळणार आहेत.

हार्दिक पंड्या हा भारतासाठी खेळणारा सर्वात प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे, त्याने २०१६ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. त्याच्या नावावर कसोटी शतक आणि कसोटीत फायफर (एका डावात ५ विकेट) देखील आहे. या दोन्ही कामगिरी त्याने परदेशात केल्या. २०१८ मध्ये श्रीलंकामध्ये त्याने शतक झळकावले आणि पाच विकेट्स इंग्लंडमध्ये घेतल्या. इंग्लंडमधील ही मालिका त्याची भारतासाठी शेवटची कसोटी मालिका होती. भारतीय संघात स्थान न मिळालेल्या हार्दिकसाठी आता आयपीएल एकमेव आशेचे किरण असणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!