मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर तसेच त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना पुन्हा एकदा संजय राऊत आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. माझ्या विरोधात तसेच माझ्या मुलाच्या विरोधात कुठलेही पुरावे नाहीत, असं सोमय्या यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, पुरावे नसताना देखील गेले काही दिवस संजय राऊत हे माझ्या विरोधात विधान करत आहेत. त्याचा खुलासा निल सोमय्या यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीत झाला आहे. मुंबई पोलिसांना संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपा संदर्भात कुठलेही कागदपत्र मिळाले नाहीत त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत.
त्यामुळे कुठलाही गुन्हा अद्याप पर्यंत दाखल झालेला नाही असा अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या सरकारवर कंट्रोल नाही. हा फक्त विषय भरकटत नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
-
“दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु”, फडणवीसांचा दावा
-
‘नोटिसा पाठवून इलेक्शन फंड जमा करतात’; मनसे आमदार राजू पाटलांचा डोंबिवली महापालिकेवर आरोप
-
“विराट कोहली कर्णधार असताना…”; भारताच्या दिग्गज माजी फलंदाजाचे मोठे विधान
-
“…तर अधिवेशनाचे कामकाज होऊ दिले जाणार नाही”, मलिकांच्या राजीनाम्यावरून भाजप आक्रमक
-
‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय अबाधित राहील’ – हरिभाऊ राठोड

