कराड : शेतकऱ्यांसाठी सरकार नवनवीन योजना राबवत असतं. तरीही शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य दर मिळत नाही. शेतकरी काढणी, मळणी आणि थेट शेतमाल विक्रीसाठी बाजार पेठेत नेतात. तरीही शेतमालाची योग्य प्रतवारी न केल्यामुळे शेतकऱ्यांना दराबाबत आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार मंडळाने एक योजना उपलब्ध केली आहे.
महाराष्ट्र राज्य वखार मंडळाच्यावतीने कराड येथे महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ५ मेट्रिक टन प्रतितास चाळण होईल या क्षमतेची धान्य चाळणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. याचा शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे. व दरातही चांगला फरक पडणार आहे. शेतकरी आता आपल्या कोणत्याही धान्याची चाळणी करू शकणार आहेत.
धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रण –
यापूर्वी देखील शेतमाल तारण योजनेतून शेतकऱ्यांना वखार महामंडळाने मोठा दिलासा दिला होता. आता या धान्य चाळणीतून देखील बराच फायदा होणार आहे. या धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रण हा उपक्रम सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आला. आता शेतकरी वर्ग आपल्या मालाची थेट विक्री न करता अगोदर प्रतवारी करू शकणार आहेत.
शेतमाल बाजारपेठेत उत्तम दर्जाचा गेला तरच शेतमालाला योग्य दर्जाचा दर मिळतो. शेतकरी हल्ली शेतीमालाकडे दुर्लक्ष करतात. व आहे तसा माल बाजारात विकला जातो. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी धान्य चाळणी उपलब्ध करण्यात आल्या. यातून शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक फायदा होणार आहे. कमी वेळेत धान्य चाळ प्रक्रिया पूर्ण होणार आहे. धान्याच्या प्रतवारी नुसार दर मिळत असतो. या योजनेतून १ तासाला ५ मेट्रिक टन धान्याची चाळणी व प्रतवारी ठरविली जाणार आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचा दर्जा सुधारून योग्य दर मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
