Share

“लवासाबाबद सत्तेचा दुरुपयोग, मी गप्प बसणार नाही”; किरीट सोमय्या आक्रमक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुणे शहरापासून अवघ्या १ तासाच्या अंतरावर असणाऱ्या लवासा सिटीला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात. लवासा प्रकल्प गेले कित्येक वर्ष वादात अडकला आहे. पर्यावरणास हानी आणि लवासा सिटी मधील काही बांधकामांची अनियमितता यामुळे लवासा सिटी प्रकल्प बऱ्याच वेळा वादात अडकला आहे. त्यातच आज माननीय मुंबई उच्च न्यायालयाने लवासा सिटी प्रकरणातील एक निकाल दिला आहे. या दरम्यान किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.

“लवासाबद्द्ल हायकोर्टाचे जजमेंट आले आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केले आहेत ते अजित पवार व शरद पवार ठाकरेंचे पार्टनर आहेत. लावासाबाबद सत्तेचा दुरुपयोग केला गेला. त्यामुळे गुन्हा दाखल होईपर्यंत मी गप्प बसणार नाही. यांच्यावर कारवाई कधी करणार?,” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, “राज्यातील जनतेला खरे काय आणि खोटे काय समजले आहे. नील सोमय्या निर्दोष आहेत. मुंबई पोलिसांनी दोषी ठरवले नसल्यामुळे मुंबई पोलिसांची बदली केली गेली. हे असे नसेल तर मुंबई पोलिसांची हकालपट्टी का केली?”

उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी…

तसेच उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी किरीट सोमय्यांवर कारवाई करू शकणार नाहीत. यासोबत मेधा सोमय्या, नील सोमय्यांवर देखील कारवाई करू शकणार नाहीत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः घोटाळे करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!