Share

“…पैकी फक्त ९०० विद्यार्थी परतले; केंद्राने फार मोठा तीर मारला नाही”, वडेट्टीवारांची टीका

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद सर्व जगभर उमटत आहेत. त्यात युक्रेनमध्ये एकूण ३० हजार विद्यार्थी अडकले आहेत. त्यापैकी केवळ ९०० विद्यार्थी मायदेशी आणले आहेत. यावरूनच मंत्री विजय वडेट्टीवार (Criticism of Vijay Vadettiwar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

“युक्रेनमध्ये ३० हजार विद्यार्थी अडकले आहेत. त्यापैकी फक्त ९०० मुलांना परत आणलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने फार मोठा तीर मारला नाही, केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.”, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

तसेच युक्रेनमध्ये ४० किमी प्रवास करून गेल्यानंतर थंडीत ते उघड्यावर झोपले. दोन विमाने आले म्हणजे सर्व विद्यार्थी आले असं होत नाही. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागेल. केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे मात्र ते वाहून जाता कामा नये. असा टोला लगावत केंद्राने प्रत्येक विद्यार्थ्याला परत आणावे. पोलंडचे राजदूत मदत करत नाहीयेत त्यामुळे त्यांना ताकीद देण्याची गरज आहे. तसेच नाटोमध्ये भारताने समर्थन न केल्यामुळे युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत नाही या मुद्द्यावरही लक्ष देणं गरजेचं असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!