Share

“रोहितने भर मैदानावर खेळाडूवर ओरडणे बंद करावे” विराट कोहलीच्या प्रशिक्षकांचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माने आपल्या कार्यकाळाची हेवा वाटावा अशी सुरुवात केली आहे. भारताला T20I मालिकेत न्यूझीलँडवर क्लीनस्वीप करण्यासाठी नेतृत्व केल्यानंतर, रोहित दुखापतीतून परतला आणि भारताने घरच्या मैदानावर एकदिवसीय आणि T20I मालिकेत वेस्ट इंडिजवर ३-० असा विजय मिळवला. मात्र या सगळ्या मालिकेत कर्णधार रोहित अनेकदा खेळाडूंवर भडकताना दिसला आहे.

विराट कोहलीकडून (virat kohli) पदभार स्वीकारल्यापासून रोहितने बाहेर देशात अद्याप संघाचे नेतृत्व केले नाही आणि भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून तो कसा कामगिरी करेल हे पाहणे बाकी आहे. कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (virat kohli childhood coach)  यांनी म्हटले आहे की, सामन्यादरम्यान दोन खेळाडू एकमेकांसोबत काम करताना पाहून आनंद वाटतो, पण त्यांना वाटते की, मैदानावरील सामन्यांदरम्यान रोहितने रागावर नियंत्रण आणावे. “रोहित शर्मा (rohit sharma) हा कूल कॅप्टन मानला जातो, पण अलीकडे मैदानावर त्याला राग आल्याचे आपण पाहिले आहे. त्याने आपला राग आपल्या संघातील सहकाऱ्यांवर सार्वजनिकपणे व्यक्त न करण्यास शिकले पाहिजे. जर एखाद्याने चूक केली असेल, तर त्याला शांततेने समजून घेणे आवश्यक आहे,”

वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यात रोहित शर्मा अनेक वेळा भारतीय खेळाडूंवर भडकताना दिसला होता. दुस-या T20I दरम्यान भुवनेश्वर कुमारने सरळ झेल सोडला तेव्हा त्याने निराश होऊन चेंडूला लात मारली होती. तर युझवेंद्र चहल ऐकत नसल्याने त्यालाही मैदानावर फटकारले होते आणि पहिल्या T20I दरम्यान खराब कामगिरी करणाऱ्या ईशान किशनशी अॅनिमेटेड चर्चा करतानाही तो दिसला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!