Share

विराटचा ‘हा’ नवीन लूक बघून चाहते म्हणाले “हे तर रब ने बनादी जोडी २”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (virat kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) नुकतेच एका जाहिरातीच्या शूटच्या सेटवर दिसले. या जोडप्याचे सेटवरील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.फोटोमध्ये विराट काळा पगडी, साधा पांढरा शर्ट आणि बेज रंगाची पँट घातलेला दिसत होता. त्याचा हा लूक बघत चाहत्यांनी एक वेगळीच चर्चा सुरु केली आहे.

चाहत्यांनी त्या दोघांच्या हा अवतार फारच भावला आहे. बहुतेक चाहत्यांना विराटचा ‘पगडी’ लुक खुप आवडला. या जोडप्याने अनेकदा जाहिरातींमध्ये एकत्र काम केले आहे आणि चाहत्यांना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आवडली आहे. त्यामुळे विराटला त्या लूकमध्ये पाहून चाहत्यांना अनुष्का शर्मा आणि शाहरुख खानची रब ने बना दि जोडी हा चित्रपट आठवला आहे. ‘विराट त्याचीच शूटिंग करत आहे का?’ असा प्रश्नही चाहत्यांनी विचारला आहे.

https://www.instagram.com/p/CaT78dBKngQ/?utm_medium=copy_link

विराट कोहलीने बायो-बबल ब्रेक (bio bubble break) दिला आहे. ज्यामुळे विराट श्रीलंका विरुद्ध टी २० मालिकेचा भाग नसणार आहे. मात्र तो पुढील महिन्यात मोहाली येथे होणारा १०० वा कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. तर अनुष्काने भारताची माजी कर्णधार झूलन गोस्वामी यांच्या जीवनावरून आणि काळापासून प्रेरित असलेल्या ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!