मुंबई: भारताचा नवीन कर्णधार रोहित शर्माने त्याच्या कर्णधारपदाची सुरुवात विजयाने केली आहे. मात्र भारतीय क्रिकेट रसिकांना आता पासून भावी कर्णधार कोण असले याची चिंता होत आहे. रोहित शर्मा कधी दुखापत ग्रस्त झाला तर बॅकअप साठी भावी कर्णधार असावा असेही काहींचे मत आहे. या सगळ्या चर्चा सुरु असता कर्णधार रोहीतनेच यावर भाष्य केले आहे. त्याने भावी कर्णधार म्हणून तीन नावे सांगितली आहेत.
रोहित म्हणाला ” तुम्ही बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल बोलल्यास, भारताच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे, त्यांच्याकडे लीडर म्हणूनही पाहिले जाते. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे हे त्यांना समजले आहे, परंतु आम्हाला त्यांच्यावर दबाव आणायचा नाही कारण ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यांनी खेळाचा आनंद घ्यावा आणि कौशल्ये अंमलात आणावीत अशी आमची इच्छा आहे,”
रोहितने पुढे या तिघांच्या प्रतिभेबाबतही सांगितले आहे.” त्यांना प्रत्येक गोष्ट सांगण्याची माझी तितकीशी भूमिका नाही, ते सर्व पुरेसे प्रौढ आहेत, जेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी असणे आवश्यक असते, तेव्हा मला ते करण्यात अधिक आनंद होईल. आम्ही रँकमधून कसे आलो आहोत, आम्हाला दुसर्याने तयार केले आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, प्रत्येकजण यातून जातो,”
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचा गंभीर इशारा! म्हणाले, “आता तिसरा नंबर…”
- युवराजच्या पत्राला विराटचे उत्तर म्हणाला “आता आम्ही दोघे…”
- नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपचे आमदार अमित साटम यांची प्रतिक्रिया
- भारतीय माजी गोलंदाज अजित आगरकर दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक होणार!
- खासदार नवनीत राणा यांनी धरला फुगडीचा फेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
