🕒 1 min read
सातारा: राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. दरम्यान साताऱ्यातील पोवई नाका येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी बोलताना उदयनराजे भावूक (Udayan Raje Bhosle emotional) होत “मी त्या काळात मावळा म्हणून जन्माला आलो असतो, तर धन्य झालो असतो”, असे म्हटले.
३०० वर्षांनंतरही छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा जल्लोष पाहून ते किती महान नेते होते, याची निव्वळ कल्पना आपण करु शकतो. असे उद्गार उदयनराजे यांनी काढले. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिसरं झालं, की लोकं विसरतात. दहावं तेरावं तर लांबच राहिलं. शिवरायांनी कधीच भेदभाव केला नाही. त्यांनी लोकशाहीचा पाया तयार केला. लोकांचा सहभाग असल्याशिवाय ते शक्य नाही, असेही उदयनराजे यांनी म्हटले.
तसेच गाड्या असताना आज लोकं म्हणतात की मला कंटाळा आला. पण त्या काळी शिवाजी महाराजांनी घोड्यावरुन प्रवास करत अख्खं साम्राज्य उभारलं. छत्रपती शिवराय खरंच एक युगपुरुषच होते. छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवराय आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात. अशा शब्दांत उदयनराजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महत्वाच्या बातम्या:
- समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; सद्गुरू बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द
- तर केंद्र सरकारने Ministry of Dress Design नेमावे; हिजाब वादावर जितेंद्र आव्हाड आक्रमक!
- भाजपचं खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणं चुकीचं – अशोक चव्हाण
- आगामी कल्याण- डोंबिवली महापालिका निवडणुकी बाबतीत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये महत्वाचा निर्णय

