Share

“जुहूच्या घरात एक इंचाचंही बेकायदा बांधकाम नाही, मातोश्रीच्या इशाऱ्यावरूनच…”, नारायण राणेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच मातोश्रीच्या सांगण्यावरूनच तक्रार करण्यात आली, असा गंभीर आरोपही राणेंनी यावेळी केला.

यावेळी बोलत असतांना राणे म्हणाले की,‘जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचंही बेकायदा बांधकाम केलं नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर असून या इमारतीला सीसी आणि ओसी मिळालेली आहे. एकही गोष्ट मी अपूर्ण ठेवली नाही. मातोश्रीच्या सांगण्यावरूनच ही तक्रार करण्यात आली. तसे तक्रारदारानेही स्पष्ट केले आहे.’ तसेच आम्हाला चांगल्या आठवणी देत असून सूडाने कारवाई होत आहे. या सर्वांना उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे, असे राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान, काल(१९ फेब्रु.)नारायण राणे यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली असून राणे यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील तारा रोडवर उभारण्यात आलेल्या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार होती. त्यासंदर्भात तपासणी करण्यासाठी मुंबई मनपाने ही नोटीस बजावली आहे. तसेच कायदा १८८८ अंतर्गत सेक्शन ४८८ नुसार ही नोटीस पाठवण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

महत्वाच्या बातम्या :         

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!