मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्ध तिसरा टी २० सामना जिंकल्यानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना रविवारी कोलकाता येथे होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. हे दोघे श्रीलंकेविरुद्ध २४ फेब्रुवारीपासून लखनऊमध्ये सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतही खेळणार नाहीत. त्यांना सध्या बायो बबल ब्रेक मिळाला आहे आणि ते कसोटीसाठी संघात सामील होतील.
वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेसाठी केएल राहुलच्या अनुपस्थितीत उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या ऋषभ पंतने दुसऱ्या सामन्यात संघाच्या विजयात दमदार अर्धशतक ठोकले.सोबतच विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. या फॉरमॅटमधील विराट कोहलीचे शेवटचे अर्धशतक पाकिस्तान विरुद्धच्या टी २० विश्वचषकात आले होते, जिथे त्याला दुबईच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर शाहीन शाह आफ्रिदीचा मुकाबला करावा लागला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारत-पाकिस्तान सामन्यासारखे दडपण नसते. ईडन गार्डन्सची खेळपट्टी उत्कृष्ट होती आणि वेस्ट इंडिजची गोलंदाजी खूपच सरासरी होती. त्यामुळे कोहलीला संधीचे सोने करत फॉर्म परत मिळवला आहे.
श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे. कोहली आणि पंत, दोघेही श्रीलंकेविरुद्ध मोहाली (४-८ मार्च) आणि बेंगळुरू (१२-१६ मार्च) येथे होणाऱ्या दोन सामन्यांसाठी परतणार आहेत. मयंक अग्रवाल, आर अश्विन, हनुमा विहारी सारखे टेस्टमधील बेस्ट खेळाडू महिन्याच्या शेवटी कोहली आणि पंत यांच्यासह चंदीगडमध्ये बबलमध्ये प्रवेश करतील. मोहाली येथे होणारा सामना हा कोहलीचा १०० वा कसोटी सामना असेल आणि BCCI ची इच्छा आहे की त्याने या महत्त्वपूर्ण प्रसंगासाठी तंदुरुस्त आणि ताजेतवाने असावे. यासाठी त्याला कोहली आणि पंतला विश्रांती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Shiv Jayanti 2022 : भगव्या कपड्याने साकारली छत्रपती शिवरायांची भव्य प्रतिमा!
- छत्रपती शिवाजी महाराजांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला तो म्हणजे ‘स्वाभिमान’ – संजय राऊत
- रणजी ट्रॉफी: खेळाडूने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड पहिल्याच सामन्यात झळकावले त्रिशतक
- छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत- पंतप्रधान मोदी
- Shiv Jayanti 2022: दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती मोठ्या उत्साहात सुरु..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

