Share

शिवरायांच्या पुतळ्याचे रात्री होणाऱ्या अनावरण प्रकाराबद्दल भागवत कराडांनी व्यक्त केली खंत

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी होणार आहे. मात्र अनावरनाची वेळ मध्यरात्री १२ वाजताची ठेवण्यात आली होती. त्यामुळे रात्री १२ वाजेनंतर ढोलताशे व इतर ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यावर बंदी असल्याने शिवप्रेमींनी नाराजी जाहीर करत अनावरणाची वेळ बदलण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे काल रात्री शिवजयंती शुभेच्छांचे बॅनर महापालिकेकडून काढण्यात आले. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान आज (गुरुवार) दुपारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी याठिकाणी पाहणी करून रात्री होणाऱ्या अनावरणाच्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असतानाही सेनेकडून उदासीनतेची भूमिका घेतली जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

या वादावर तोडगा म्हणून महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे (Municipal Commissioner Astik Kumar Pandey) यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन आता १२ ऐवजी १० वाजता होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र तरीही शिवप्रेमींमध्ये नाराजी दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!