कोल्हापूर: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी वापरलेल्या भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, जुनी थंड प्रकरणे उकरून काढून राऊत हे ठाकरे यांनाच अडचणीत आणत आहे. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे वाटू लागले आहे. अशामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावत असल्याच्या अजित पवार यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे.
समीर वानखेडेंवर रोज आरेाप झाले. राष्ट्रीय मागास आयोगाने आता नोटीसा काढल्या आहेत. गेल्या २७ महिन्यात न्यायालयांनी इतके फटके देवूनही यांच्यामध्ये सुधारणा होत नाही. आता सोमय्या, काळे, कंबोज सगळेच कोर्टात जातील. राऊत यांनी धमक्या देवू नयेत. त्यांचे सरकार आहे. थेट कारवाई करून दाखवावी, असे आव्हानच पाटील यांनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या:
नवी मुंबई ते मुंबई प्रवास आता फक्त ३० मिनिटात; वॉटर टॅक्सी सेवेत दाखल
Ind Vs Wi 1st T20: “दात नको दाखवू, बॉलिंग कर”; रोहितने चहलला लाइव्ह मॅचमध्ये केले ट्रोल
पुणे शहरातील राजकारण तापले ; सत्ताधारी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीची थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार
हिंदुस्थानी भाऊला १६ दिवसांनी मिळाला जामीन, विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी झाली होती अटक


