🕒 1 min read
बंगळुरू : IPL मेगा ऑक्शनमध्ये अंडर १९ वर्ल्डकप विजेत्या संघाचा धमाकेदार अष्टपैलू खेळाडू राज बावाला पंजाब किंग्सने आपल्या संघात घेण्यासाठी २ कोटी रुपये खर्च केले. तो डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे. आणि अष्टपैलू म्हणून बावा स्टार परफॉर्मेंस आहेत. अंडर-१९ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात राजला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले होते.
राज बावा बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत एक आश्वासक खेळाडू म्हणून उदयास आला आहे.अंडर १९ स्पर्धेत बावाने ५ सामन्यात ६३ च्या सरासरीने २५२ धावा केल्या होत्या. स्पर्धेत डावात नऊ विकेट्स घेतल्या. स्पर्धेत, बावाने युगांडा विरुद्धच्या सामन्यात नाबाद १६२ धावा केल्या आणि शिखर धवनच्या १५५ नाबादच्या धावसंख्येला मागे टाकून स्वतःचे नाव नोंदवले.
राज बावा क्रीडा क्षेत्रातील समृद्ध वारसा असलेल्या कुटुंबातून आलेला आहे. त्यांचे आजोबा- दिवंगत तरलोचन बावा हे १९४८ लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते. तर त्याचे वडील सुखविंदर बावा यांनी युवराज सिंग आणि व्हीआरव्ही सिंग या खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची जोरदार तयारी
- IPL Auction 2022 : १९ वर्षीय खेळाडूवर मुंबईचा करोडोचा ‘तिलक’
- IPL AUCTION 2022: दिल्लीच्या संघात पुन्हा एक वर्ल्डकप विनींग कर्णधार
- किरीट सोमय्यांचा सत्कार केल्या प्रकरणी ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल
- ‘…तर आघाडी करण्यास हरकत नाही’; एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
