Share

विराटवर प्रश्नचिन्ह उठताच रोहित म्हणाला “क्या बात कर रहे हो!”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश केला. संपूर्ण मालिकेत गोलंदाजांनी चमक दाखवल्यामुळे त्यांना ,मालिका सहजतेने जिंकता आली. मात्र भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीलाच्या बॅटला सूर काही गवसला नाही. तो शेवटच्या दोन सामन्यांमध्ये शून्यासह तीन सामन्यात केवळ २६ धावा करू शकला. याबाबत पत्रकार परिषदेत कर्णहदार रोहितला प्रश्न विचारल्यात आला तेव्हा रोहितने विराटला पाठींबा दिला आहे.

दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला आणि कोहलीसाठी ७१ व्या शतकाची प्रतीक्षा संपुष्टात आणू शकला नाही. तिसरा एकदिवसीय सामना संपल्यानंतर सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहितला विराटच्या फॉर्मबाबत विचारण्यात आले. पत्रकारांनी विराटबाबत विचारणे साहजिकच होते. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दोन अर्धशतके झळकावली होती. विराटमध्ये आत्मविश्वासाची गरज आहे, या प्रश्नाला रोहितने उत्तर दिले ““विराट कोहली को कॉन्फिडन्स की जरूरत है? क्या बात कर रहे हो यार.(विराट कोहलीला आत्मविश्वासाची गरज आहे? काय सांगत आहेस मित्र) त्याचे शतक झाले नाही ही गोष्ट वेगळी, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने तीन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली होती. मला वाटत नाही की यात काही चुकीचे आहे. टीम मॅनेजमेंटल अजिबात चिंता नाही,”

रोहित शर्मा आधी विराट कोहलीने सुद्धा रोहित साठी पत्रकार परिषदेत उत्तर दिले होते. ज्यात विराटला रोहित शर्माला टी २० संघातुन काढून देऊ शकता का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विराटने आश्चर्य व्यक्त करत आणि हसत उत्तर दिले ” रोहितला टी २० संघातून मी काढेन? तुम्हाला माहिती आहे का त्याने मागच्या सामन्यात काय कामगिरी केली होती ?” विराट आणि रोहित मधील वादांच्या चर्चा नेहमीच चालत असतात मात्र आता त्यांचातील मैत्री सुद्धा चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!