Share

पंतप्रधान मोदीजी, हे भाजपचे संस्कार आहेत का?- चंद्रशेखर राव

Published On: 

हैद्राबाद : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा(Himanta Biswa Sarma) यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामनेही बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव(Chandrashekhar Rao) यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच पंतप्रधान मोदीजी, हे भाजपचे संस्कार आहेत का?, असा सवालही राव यांनी केला आहे.

हैदराबादमधील रायगिरी येथे एका जाहीर सभेत बोलत असतांना चंद्रशेखर राव म्हणाले की,‘पंतप्रधान मोदीजी, हे भाजपाचे संस्कार आहेत का? हा आपला हिंदू धर्म आहे का? ही आपल्या देशाची संस्कृती आहे का? एका नेत्याला तुमचे मुख्यमंत्री तुमचे वडील कोण आहेत? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. वेद, भगवदगीता, महाभारत, रामायणामधून आपल्याला हेच शिकवलं आहे का?तसेच जर तुम्ही इमानदार असाल तर आसामच्या मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करा’, असे चंद्रशेखर राव म्हणाले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांना पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल पुरावा हवा होता. मात्र आम्ही त्यांना तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा विचारला आहे का? जर आमच्या सैनिकांनी स्ट्राइक केल्याचे सांगितले असेल, तर तुम्हाला पुरावे मागण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल हिमंता बिस्वा शर्मा यांनी केला होता.

 महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!