Share

“माणुसकी हाच खरा धर्म”, अनावश्यक मुद्द्यांवरून वाद घालणाऱ्यांनी हे समजून घ्यावं- रोहित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशात सध्या कर्नाटक मधील हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रावरही उमटत आहेत. हिजाब मुद्दा आता धार्मिक वादाचा मुद्दा बनून ठेपला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातही कलगीतुरा सुरु असल्पयाचे पहावयास मिळत आहे. मात्र अशात एकात्मता, भारतीय संस्कृती दर्शवणारा एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (NCP leader Rohit Pawar) यांनी ट्वीटरवर पोस्ट करत “माणुसकी हाच खरा धर्म”, असल्याचे म्हटले आहे.

“जात-धर्म न पहाता माणुसकी हाच खरा धर्म समजून संकटाच्यावेळी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, ही आपली खरी भारतीय संस्कृती आहे. अनावश्यक मुद्द्यांवरून वाद घालणाऱ्यांनी हे समजून घ्यायला हवं!”, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

दरम्यान रोहित पवार यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये मेहबूब नावाच्या व्यक्तीने एक मुलीला ट्रेन अपघात होता-होता वाचवले आहे.
३७ वर्षांचा मेहबूब त्याच्या फॅक्टरीत परतत होता तेव्हा त्याला आणि काही इतर पादचाऱ्यांना मालगाडी दिसली. मात्र त्याचवेळी एक मुलगी आपल्या
आई-वडिलांसोबत रुळावर उभी होती. आणि यावेळी क्षणाचाही विचार न करता मेहबूब धावून गेला. आणि त्याने तिचा जीव वाचवला. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!