🕒 1 min read
हापूर : ‘एमआयएम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी(Asaduddin Owaisi) यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी(३ फेब्रु.) सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी ओवेसींवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. त्यानंतर याप्रकरणी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक करण्यात आली होती. तद्पश्चात आता या हल्ल्यात हल्लेखोरांना पिस्तुल विकणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी मिळाली असून चौकशीत त्यांनी ओवेसींचे भाषण ऐकून अस्वस्थ झालो आणि जीवे मारण्याचा कट रचला अशी कबुली दिली होती. तसेच या आता पिस्तूल विकणाऱ्यासंदर्भात अधिक माहिती देत एसएसपी सर्वेश कुमार मिश्रा म्हणाले की,‘पिस्तूल विकणाऱ्या व्यक्तीचे नाव अलीम असून तो मेरठच्या मुंडली पोलिस स्टेशन हद्दीतील नंगलामालचा रहिवासी आहे. अलीमने सचिनला 1.20 लाख रुपयांना दोन पिस्तूल आणि 40 काडतुसे विकली होती’, असे मिश्रा यांनी सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात पोलिसांना माहिती देत मुख्य आरोपी सचिनने सांगितले होते की, मला मोठा राजकीय नेता व्हायचे आहे. ओवेसीचे भाषण ऐकून मी अस्वस्थ झालो. त्यामुळेच जवळचा मित्र शुभमसोबत ओवेसीच्या हत्येचा कट रचला होता, मी जेव्हा ओवेसींवर गोळीबार केला तेव्हा ते खाली वाकले. त्यामुळे मी खाली गोळी झाडली आणि मला वाटले की त्यांना गोळी लागली आहे. मग मी पळून गेलो.’
महत्वाच्या बातम्या :
- Hijab controversy: हिजाब मुद्द्यावरून कर्नाटकातील भाजप आमदाराला जीवे मारण्याचा धमक्या
- पंतप्रधान मोदीजी, हे भाजपचे संस्कार आहेत का?- चंद्रशेखर राव
- IPL AUCTION 2022: ‘चेरी ऑन द टॉप’; दीपक चहर ठरला इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज
- “माणुसकी हाच खरा धर्म”, अनावश्यक मुद्द्यांवरून वाद घालणाऱ्यांनी हे समजून घ्यावं- रोहित पवार
- IPL AUCTION 2022: आवेश खान ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू


