🕒 1 min read
मुंबई :विराट कोहलीच्या बॅटचा गेल्या दोन वर्षांपासून सूर हरवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तो केवळ दोन चेंडूत खेळत शून्यावर माघारी परतला आहे. विराटाचे चाहते आणि इतर क्रिकेटरसिकही त्याच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा करत असताना विराटला चांगली कामगिरी करता येत नाहीये.
विराटने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये आठ आणि १८ धावा केल्या होत्या. मात्र चाहत्यांना अपेक्षा होती कि कोहली शेवटच्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करेल. भारताने आधीच मालिका २-०ने जिंकली असल्याने त्याच्यावर कोणताही दबाव नव्हता. मात्र त्याने पुन्हा निराशादायक खेळी केली आहे. चौथ्या षटकात कर्णधार रोहित शर्मा १३ धावांवर बाद झाल्यानंतर कोहली फलंदाजीला आला. कोहलीने पहिला चेंडू सोडला, जो ऑफ-स्टंपच्या बाहेर होता. दुसरा बॉल त्याने एजला खेळला आणि यष्टिरक्षक शाई होपने सुरेख झेल घेतला. विराटही भोपळा घेत परताना निराश झालेला दिसला. गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीचा हा दुसरी डक (शून्यावर बाद ) खेळी होती. विराटाचे खराब फॉर्म बघता बघता चाहते आता पार मेटाकुटीला आलेले आहेत.
If breakup hurts more
This kills..#Kohli #ViratKholi #IndianCricketTeam #INDvsWI pic.twitter.com/UeanGBT0k8
— naanu (@naanenaanu24) February 11, 2022
Golden Duck????
What happened @imVkohli
Please come back ❤️#ViratKholi #IndiaVsWestIndies #INDvsWI pic.twitter.com/Wj8eZRPSD9— Mollywood Exclusive (@Mollywoodfilms) February 11, 2022
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्येही वाद निर्माण झाले आहेत.टी २० वर्ल्डकपनंतर भारताच्या कर्णधारपदावरून पायउतार झालेल्या कोहलीची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एकदिवसीय कर्णधारपदावरून धक्कादायकपणे हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातही दारी निर्माण झली आहे. शिवाय, गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा २-१ असा पराभव झाल्यानंतर कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले.गेल्या काही महिन्यांपासून विराटच्या कारकिर्दीला ग्रहण लागल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uttarakhand Assembly Election 2022: ‘सबमें डालो फूट, मिलकर करो लूट’ हाच कॉंग्रेसचा फॉर्मूला- नरेंद्र मोदी
- Breaking News : बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा कारावास
- IPL 2022 AUCTION: ऑक्शनपूर्वी दिल्लीने निवडले ‘हे’ खेळाडू ; लावणार मोठी बोली
- ‘मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे नाहीत’; जयंत पाटलांचे किरीट सोमय्या प्रकरणी वक्तव्य
- Goa Assembly Election 2022 : गोव्यात आज होणार आदित्य ठाकरेंची सभा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
