🕒 1 min read
मुंबई: भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना बरेच वर्ष चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. मात्र या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किग्सने त्याला रिटेन केले नाही. त्यामुळे अनेक संघ रैनाला खाजरेदी करायला उत्सुक दिसत आहे. यात सर्वात पहिले नाव आयपीएल इतिहासातील दुसरा गुजराती संघ ” अहमदाबाद टायटन्सचा ” आहे. सुरेश रैनाने याआधी गुजरात लायन्स या संघाचे दोन वर्ष नेतृत्व केले होते. त्यामुळे रैना गुजरातला परतणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
सुरेश रैना २००८ पासून चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. रैना शेवटच्या वेळी २०१६ आणि २०१७ मध्ये इतर कोणत्याही आयपीएल संघासाठी खेळला होता. कारण जेव्हा चेन्नईवर बंदी घालण्यात आली होती. त्याने दोन हंगामांसाठी गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व केले आणि कर्णधारपद भूषवले. २०१८ मध्ये बॅन संपल्यावर चेन्नई परतल्यानंतर त्यांनी रैना , धोनी आणि जडेजाला रिटेन केले होते. त्याने २०२० मध्ये वैयक्तिक कारणास्तव आयपीएल मधून माघार घेतली होती.
सुरेश रैना इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याला मिस्टर आयपीएल म्हणून सुद्धा ओळखले जाते. विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या मागे तो लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने २०५ आयपीएल सामने खेळले आहेत ज्यात त्याने ५५२८ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- न्यायालयावर तुमचा विश्वास नाही का? – चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल
- कर्नाटक हिजाब प्रकरण: शाळेच्या गणवेशाचे पालन करा – यास्मिन निगार खान
- टी -२० सामन्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यास पण मुकणार स्मृती मानधना, जाणून घ्या कारण
- उद्धव ठाकरेंच्या आदेशाने माझ्यावर गुन्हा दाखल – रवी राणा
- पुष्पाची क्रेझ थांबेना! श्रीवल्ली गाण्यावर थिरकली राणू मंडल; व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
